निपाणीला वादळी पावसाचा तडाका : दोन कोटींहून अधिकचे नुकसान

निपाणी: प्रतिनिधी
निपाणी शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने शहरातील मुख्यता भीम नगर परिसराला वादळी पावसाचा मोठा तडाका बसला असून अंदाजे दोन कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. भीम नगर भागातील विद्या मंदिर या हायस्कूलचे इमारतीवरील भव्य लोखंडी शेड पत्र्यासह उपटून शेजारील घरावर वाहनांच्यावर पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील अनेक झाडे फांद्या तुटून रस्त्यावर घरावर वाहनावर पडण्याचे प्रकार घडले आहेत यामध्ये काल सायंकाळपासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे संपूर्ण रात्र निपाणी अंधारात राहिली आहे.


निपाणी शहरात काल सायंकाळी सहा वाजता पावसाला सुरुवात झाली सुरुवातीला पावसापेक्षा वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहत होते या वाऱ्याने अनेक झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर विद्युत खांबावर घरावर वाहनांच्या पडले आहेत त्यामुळे वाहनांचे घरांचे विद्युत खांबांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील भीम नगर परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील विद्या मंदर हायस्कूल शाळेच्या मराठी लोखंडी शेड होते हे शेड पूर्णपणे उकडून बाजूंच्या घरावर अनेक वाहनांच्या पडले आहे त्यामुळे घरांचे वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच बेळगावला नाका येथील बाबा लोन या सभागृहावरील ही पत्रे उडून पडले आहेत. तर निपाणी बस स्थानक परिसरातील अनेक झाडे फांद्या तुटून रस्त्यावर पडले आहेत.

त्यामुळे विद्युत तारा तुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत यामुळे सायंकाळी सहा वाजल्यापासून सर्व विद्युत खंडित झाला होता रात्री पूर्ण रात्र निपाणी अंधारात होती त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सकाळी विभागाने सर्व भागात पाहणी केली असली तरी उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला नव्हता त्यामुळे निपाणी शहराला वादळी पावसाने दोन कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

About The Author