नांदणी काळभैरवनाथ यात्रेतील व्यापा-यानी मागितली गावकऱ्यांची माफी
नांदणी (वार्ताहर) नांदणी ता.शिरोळ येथील श्री. काळभैऱनाथ यात्रा श्रावण महिन्यात भरत आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी येथे येणा-या व्यापा-याच्यातून ग्रामपंचायतीकडून 70 रुपये फुटप्रमाणे भाडे आकारण्यात येणार अशी गैरसमज झाल्याने परत आम्ही गावाकडे जावू परंतू खेळणी मांडणार नाही अशी भूमिका घेतली होती.
यावर या व्यापारी संघटनांकडून व्हायरल झालेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी संपूर्ण गावची माफी मागून आम्ही ग्रांमपंचायतीबरोबर चर्चा केली नव्हती आणि आता येथून पुढे आम्ही ग्रामपंचायतीबरोबर चर्चा करुन यात्रा कमिटी साठी जी पावती आहे. ती कमी करायला लावून ग्रामपंचायतीने आम्हाला प्रत्येक वर्षी प्रमाणे या ही वर्षी सहकार्य करावे आणि झालेल्या वक्तव्याबद्दल बाबत अफवा पसरली आहे. याबाबत आम्ही संपूर्ण गाव व ग्रांमपंचायतीकडे माफी मागतो आणि सालाबादप्रमाणे या वर्षी ही भैरवनाथाची यात्रा जोरात भरू दे अशी मागणी परत एकदा याच व्यापाराच्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे.