अधिकाराचा वापर लोककल्याणासाठी करा – चैतन्य ढोले
आष्ट्यात विविध शासकीय विभागांमध्ये निवड झालेल्या तरुणांचा सत्कार
आष्टा (प्रतिनिधी)
अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढली आहे. स्पर्धा परीक्षेकडे फॅशन म्हणून न्हवे तर पॅशन म्हणून पहिले पाहिजे. अधिकाराचा वापर लोककल्याणासाठी झाला पाहिजे. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, सातत्य, असेल तर यश मिळतेच, असे प्रतिपादन कृष्णा पेट्रोल पंपाचे मालक चैतन्य ढोले सावकर यांनी केले.
विविध शासकीय विभागांमध्ये निवड झालेल्या तरुणांचा सत्कार चैतन्य ढोले सावकर यांच्या हस्ते झाला.याप्रसंगी आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी प्रवीण सुनीता राजाराम ढोले रायगड पोलीस आणि जिल्हा सत्र न्यायालय अलिबाग रायगड, प्रकाश इंद्रजीत ताटे ठाणे शहर पोलीस, सौरभ पेटारे सिंधुदुर्ग पोलीस, निलेश कोळी सातारा पोलीस, सोहेल सनदी रायगड पोलीस, महेश टकले जिल्हा सत्र न्यायालय रत्नागिरी,यांच्या निवडी झाल्याने सत्कार झाला.
चैतन्य ढोले म्हणाले,जगात अशक्य असे काहीच नाही. तरुणांनी योग्य वयात स्वतःला प्रवृत्त सिद्ध करीत स्पर्धेसाठी झोकून द्यायला हवे. करियरच्या वेगळ्या वाटा चोखळायला हव्यात.आज सर्वसामान्य कुटुंबातील युवकांच्यात खाकी वर्दीचे आकर्षण वाढत आहे. खाकी वर्दीतील दर्दीपणातून तरुण दिवसभर मैदानावरती घाम गाळून जीवाची पराकष्ठा करीत आहेत.आज आष्टा परिसरातून यशस्वी तरुणांची वाढणारी संख्या कौतुकास्पद, व सराव करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही असा चंग बांधल्यास यश निश्चित मिळतेच. उद्योजक सुशांत चौगुले, डॉ विनायक माने,कॅपिटल ग्रोथ शेअर मार्केटिंग चे प्रमुख संभाजी हजारे, सोमाजी डोंबाळे, ज्ञानेश्वर बेरगळ, ज्ञानेश्वर नरळे, सिने कलाकार अंकुश कदम प्रमुख उपस्थित होते.