साळुंखे महाविद्यातील मतदार नोंदणी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास तहसीलदार धुमाळ यांची भेट

१८ वर्षे पूर्ण असणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घेण्याचे केले आवाहन

मिरज (प्रतिनिधी)
येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात नवमतदार नोंदणी, नावात बदल या अनुशंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनी महाविद्यालयात सुरु असलेल्या सदर शिबीराची माहिती घेऊन जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी महत्वपूर्ण सूचना केल्या.

त्यांनी मतदार नोंदणी बाबत समाधान व्यक्त करीत दि.18 ऑगस्ट (रविवार) या दिवशीही सदर कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. 18 वर्षे पूर्ण असूनही मतदार यादीत नाव नसलेल्या विद्यार्थी तसेच नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी महाविद्यालयातील 18 वर्षे पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणी बाबतची माहिती दिली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. सुहास वाघमोडे, प्रा. डॉ. यशवंत हरताळे, अधिक्षक रावसाहेब लवटे, नायब तहसिलदार ओमासे व विविध मतदान केंद्र निहाय बी एल्.ओ. उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचा बी. ए. भाग दोनचा अपंग विद्यार्थी निलेश गायकवाड याचा नोदणी फॉर्म तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनी स्विकारला.

About The Author