ध्येयपूर्तीसाठी इच्छाशक्ती व आवड महत्वाची : आयुक्त शुभम गुप्ता

कन्या महाविद्यालय, मिरज मध्ये संस्थेचा ४१ वा वर्धापन दिन उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)

आपण समोर ठेवलेलं ध्येय व त्याची पूर्तता करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती व आवड महत्वाची असून त्याद्वारे घेतलेले कष्ट आपल्याला यशापर्यंत घेऊन जाते असे मत सां.मि.कूपवाड महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी व्यक्त केले ते कन्या महाविद्यालय, मिरज मध्ये संस्थेच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विनायक गोखले होते.

कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वल करुन झाली.त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धा व परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.या पारितोषिकांचे वाचन प्रा.डॉ.गंगाधर चव्हाण व प्रा.पांडुरंग तपासे यांनी केले.संस्थेचे अध्यक्ष विनायक गोखले यांनी इंग्रजी विषयाचे ज्ञान सद्य:स्थितीत अतिशय गरजेचे असून त्यासाठी भविष्यात कॉलेजमध्ये मार्गदर्शन वर्ग तसेच सायन्स शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचे मत आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर मराठे,संस्था सचिव राजू झाडबुके,संस्थेचे सदस्य अभय गोगटे व संस्थेचे पदाधिकारी तसेच उपप्राचार्या डॉ.सुनीता माळी,पर्यवेक्षिका सौ.नलिनी प्रज्ञासूर्य,सिनिअर व ज्युनिअर कॉलेज मधील सहकारी प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ.उल्हास माळकर यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.कविता शूल्ह्यान यांनी करून दिली.कार्यक्रमाचे आभार प्रा.तुषार पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.अनुराधा पवार व प्रा.सुवर्णा यमगर यांनी केले.

About The Author