मिरजेतील डझनभर माजी नगरसेवक सातपुते यांच्या पाठीशी ; ग्रामीण व शहरी भागात ही मविआ एकसंघ असल्याची दिली ग्वाही
मिरज प्रतिनिधी
मिरजेतील काँग्रेस, राष्ट्रवादीचे 13 अर्थात सर्व नगरसेवक महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा उमेदवार तानाजी सातपुते यांच्यासोबत आहेत. मिरजेत महाविकास आघाडी एकसंघ आहे. शहर आणि ग्रामीण भागातून मोठे मताधिक्य देऊन तानाजी सातपुते यांना विजयी करण्यासाठी शहरी भागातील सर्व नगरसेवक एक दिलाने काम करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. मिरजेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांसह नगरसेवकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी सेनेचेही पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर जामदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय मेंढे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत हारगे, माजी नगरसेवक अय्याज नायकवडी, करण जामदार, मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे विधानसभा उमेदवार तानाजी सातपुते, दिगंबर जाधव, माजी नगरसेविका संगीता हारगे, शारदा माळी, शीतल सोनवणे, आझम काझी, जुबेर चौधरी, शिवाजी दुर्वे, तानाजी रुईकर, वसीम रोहिले, संदीप होनमाने, विजय माळी, चंद्रकांत हुलवान, सचिन जाधव, संदीप सलगर, धनराज सातपुते, धनंजय भिसे, संजय मेथे, विजय माळी यांच्यासह शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, बसवेश्वर सातपुते, महादेव हुलवान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस राष्ट्रवादीचे १३ नगरसेवक तानाजी सातपुते यांच्या पाठीशी आहेत असे यावेळी घोषित करण्यात आले. यावेळी बोलताना हे सर्व माजी नगरसेवक म्हणाले की, आम्ही सर्व काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तानाजी सातपुते यांच्यासोबत आहोत.
मिरज मतदार संघाचे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांचा प्रचार शुभारंभ आज गुरुवार दि.७ रोजी सकाळी पावणेदहा वाजता किसान चौक येथे होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, शिवसेनेचे उपनेते नितीन बानूगडे पाटील हे उपस्थित असणार आहेत. महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आण्णासाहेब कोरे, वास्कर शिंदे, संजय काटे, संजय मेंढे, अभिजित हारगे, चंद्रकांत मैगुरे यांनी केले आहे.