युवकाचा वेदगंगा नदीत बुडून मृत्यू

निपाणी ; (प्रतिनिधी)

        गावातील उरूस झाल्यानंतर धुणे धुण्यासाठी नदीवर गेले असता पाय घसरून नदीत पडल्याने बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सिदनाळ (ता. निपाणी) येथे घडली. जावेद रमजान बारगीर (वय 31) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

  याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, सोमवारी सीदनाळ येथील उरूस संपन्न झाला होता. त्यामुळे मंगळवारी सकाळी 11 वाजता धुणे धुण्यासाठी जावेद हे वडील रमजान आई तारानभी व भावासह धुने धुण्यासाठी नजीकच्या वेदगंगा नदीवर गेले होते.

नदीला पाणी सोडल्यामुळे पात्रात जास्त पाणी असल्याने ममदापूर बाजूला बारगिर परिवार धुने धुत होते. यावेळी जावेद याचा तोल गेल्याने नदीत असणाऱ्या खड्ड्यात पडून जावेद बुडू लागला. त्याला पोहता येत नसल्याने तो घुटमळ्या खाऊ लागला यावेळी वडील रमजान व इतरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आई व इतरांनी हार्ड ओरड करून  सर्वजण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तो पाण्यात पूर्ण बुडाला. शोध लागत नसल्याने यावेळी घटनेची माहिती निपाणी ग्रामीण पोलीस ठाणे व निपाणी अग्निशामक दलाला देण्यात आली अग्निशामक दलाचे जवान जे बी कोरव ए डी मुल्ला डी एल कोरे व्ही एस देवऋषी व्हीबी नाईक एस एस कट्टी यांनी तात्काळ गंगा नदीवर जाऊन जावेद याचा मृतदेह नदी बाहेर काढला. घटनास्थळी तहसीलदार एम एन बळीगार यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवून देण्यात आला आहे.

जावेद यांच्या पश्चात आई-वडील भाऊ पत्नी एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेने सिदनाळ गावावर शुक काळा पसरली आहे.

Youth drowns near Sidanal in Vedganga river

About The Author