आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा मिरजेत जल्लोष
साळुंखे महाविद्यालयात फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि मिठाई वाटप
मिरज (प्रतिनिधी)
पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी विजय संपादन केल्याबद्दल मिरजेतील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि मिठाई वाटप करून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.
कौस्तुभ गावडे यांच्या विजयाबद्दल आयोजित या आनंदोत्सवात आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि गुरुदेव बंधू-भगिनींनी एकत्र येत आनंद व्यक्त केला. यावेळी संपूर्ण महाविद्यालय परिसर जल्लोषाने दुमदुमून गेला होता.
याप्रसंगी नगरसेवक मोहन वाटवे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब आळतेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन जाधव, माजी प्राचार्य विष्णू पाटील, रजिस्ट्रार रावसाहेब लवटे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. आकाश बनसोडे, डॉ. हडताळे, एम. बी. ज्युनिअर विभागाचे इन्चार्ज के. बी. पाटील, डॉ. संजय शेंडगे, डॉ. शहीदा जमादार, प्रा. सुचिता पाटील, डॉ. पुष्पा पाटील, डॉ. स्वाती हाके यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि गुरुदेव बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


