काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आगमनाने भाजप पक्षाला अधिक बळ ः आमदार शशिकला जोल्ले_

0
IMG-20260723-WA0033

बेनाडीतील 30 हून अधिक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील

निपाणी,ता.23(प्रतिनिधी)-
निपाणी मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आगमनाने भाजप पक्षाला अधिक बळ मिळाले आहे. निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगीतले.देंशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या केंद्र सरकारच्या विकासकामांचे आणि शशिकला जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघात केलेल्या विकासकामांचे कौतुक करत, निपाणी मतदारसंघातील बेनाडी गावातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्या बोलत होत्या.
यावेळी दलित समाजाचे नेते बाळासो माळगे, मोहन कोरे, अजित माने, महादेव बोरे,संजय गोरे, दीपक गोरे, रमेश कोरे, प्रभाकर मधाळे, गणपती गोरे, अर्जुन कांबळे, सुरेखा वराळे, राजश्री माळगे व त्यांच्या टीममधील 30 हून अधिक सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.या सर्वांचे माजी मंत्री आणि आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी प्रवेश केलेल्या सर्वांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले.
यावेळी हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक रमेश पाटील, श्रीकांत बन्ने, भरत नसलापुरे, राजू चांदुरे, पांडुरंग पाटील, सत्याप्पा हजारे शिवराज पन्नुरे, अ
रुण जविर, सदाशिव जनवाडे, रावसाहेब जनवाडे, लक्ष्मी खोत, बबन हवालदार व स्थानिक नेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *