फास्ट फूड स्टॉल उद्यमी प्रशिक्षण आरसेटीमार्फत मोफत सुरू

मिरज (प्रतिनिधी)
बँक ऑफ इंडिया व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली यांच्यामार्फत आरसेटी, मिरज येथे मोफत फास्ट फूड स्टॉल लघु उद्यमी प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी सांगली जिल्ह्यातील फक्त ग्रामीण भागातील १८ ते ४५ वयोगटातील असलेल्या महिला, पुरूष, युवक व युवतीं यांनी आजच संपर्क साधावा, असे आवाहन आरसेटीमार्फत करण्यात आले आहे.
प्रशिक्षणादरम्यान मोफत प्रशिक्षण, मोफत निवासाची सोय, प्रशिक्षणा दरम्यान लागणारे साहित्य, प्रशिक्षणा दरम्यान मोफत चहा, नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीच्या जेवणाची सोय आहे. संचालक महेश पाटील यांनी संस्थेअंतर्गत घेण्यात येणारे पुढील प्रस्तावित मोफत प्रशिक्षण कार्यक्रम ‘पुरुषांसाठी मेन्स गारमेंट’, ‘फास्ट फूड स्टॉल लघु उद्यमी’, टू व्हिलर मेकॅनिक वर्क, घरगुती (हाउस) वायरिंग, सीसीटीव्ही कॅमेरा, आग प्रतिबंधक सुरक्षा अलार्मची सेवा आणि सर्व्हिसिंग, वस्त्रचित्रकला (फॅब्रिक पेंटिंग, जरदोशी, आरीवर्क, एम्ब्रॉयडरी) उद्यमी, मशरूम/अळंबी लागवड, सॉफ्ट टॉईज बनविणे, कॉस्च्युम ज्वेलरी बनवणे या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. पंढरपूर रोड, डॉ. बापुजी साळुंखे कॉलेजच्या पाठीमागे, रमा उद्यान शेजारी, मिरज येथे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेमध्ये येऊन भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.