डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिप

0
डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिप

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता

कोल्हापूर  (प्रतिनिधी): डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल एफआयसीपी फेलोशिप (फेलो ऑफ इंडियन कॉलेज ऑफ फिजिशियन) ने सन्मानित करण्यात आले.  असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (ए.पी.आय.)च्यावतीने पटणा येथे आयोजित ८१व्या ‘अॅपीकॉन’ राष्ट्रीय वार्षिक परिषदेमध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला.

       ही राष्ट्रीय परिषद पटना (बिहार) येथील सम्राट अशोक कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नुकतीच पार पडली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले.  ‘अॅपीकॉन’ ही जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित वैद्यकीय परिषदांपैकी एक असून या परिषदेत देश-विदेशातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.  या परिषदेत डॉ. ख्यालप्पा यांनी ‘हेमोडायलिसिस इंड्यूस्ड हायपोग्लायसेमिया अँड करेक्टिव मेजर्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

       या राष्ट्रीय मंचावर डॉ. राजेश ख्यालप्पा यांना अंतर्गत औषधोपचार (मेडिसिन), वैद्यकीय शिक्षण, रुग्णसेवा तसेच प्रदीर्घ अनुभवाच्या आधारावर हा विशेष सन्मान देण्यात आला. डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिनेश चंद्र राय यांच्या हस्ते डॉ. राजेश ख्यालप्पा यांना यावेळी गौरविण्यात आले.  यावेळी ए.पी.आयचे अध्यक्ष जे. नरसीमुलू, डीन डॉ. दिनेश माथुर यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. हा सन्मान वैद्यकीय क्षेत्रात उच्च दर्जाचे मानदंड प्रस्थापित करणाऱ्या देशातील निवडक डॉक्टरांनाच दिला जातो.  

       डॉ. ख्यालपा यांच्या यशाबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे  कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले,  डॉ. ख्यालप्पा यांनी रुग्णसेवा, अध्यापन आणि प्रशासन या सर्वच पातळीवर अतिशय चांगेल काम केले आहे. त्यांच्या या यशामुळे डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचाही गौरव झाला आहे. या सन्मानाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाचे प्र- कुलपती ऋतुराज पाटील, विश्वस्त आणि शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य  पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले. 

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *