जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती रॅली; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
कर्करोगतज्ज्ञ डॉ. अक्षय शिवछंद यांनी उपचारपद्धतींबाबत माहिती दिली.
कोल्हापूर (प्रतिनिधी) कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक कर्करोग दिन निमित्त कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीतून कर्करोग प्रतिबंध, वेळेवर निदान व उपचाराबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली.
जनजागृती रॅलीत कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, महाविद्यालयाचे प्राचार्य भालचंद्र कुलकर्णी, चिदानंद पाटील, उपप्राचार्य डॉ. रविकुमार नाईक, उपप्राचार्य डॉ. सुरेश फराकटे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. फलक, घोषवाक्ये आणि संदेशांच्या माध्यमातून कर्करोगाविषयी जनजागरण करण्यात आले.
यानंतर आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात CuraLife Cancer Centre, Kolhapur येथील कर्करोगतज्ज्ञ डॉ. अक्षय शिवछंद यांनी कर्करोग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, जीवनशैलीतील बदल, वेळेवर तपासणीचे महत्त्व तसेच कर्करोग झाल्यास घाबरून न जाता उपलब्ध वैद्यकीय उपचारपद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विश्वनाथ मगदूम होते. प्रमुख उपस्थितीत प्राचार्य भालचंद्र कुलकर्णी, चिदानंद पाटील, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजात कर्करोगाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


