निपाणीत श्री ज्वेलर्स दुकानावर धाडसी दरोडा

0
IMG-20261012-WA0095

निपाणी,ता.12(प्रतिनिधी)-
येथील कित्तूर चन्नम्मा सर्कल जवळील अशोकनगर भागातील श्री ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानावर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला.विलास गणपतराव माळी (अध्यक्ष, सराफ संघटना) यांच्या मालकीच्या या दुकानात पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कारमधून आलेल्या संशयितानी हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच सीपीआय बी.एस.तळवार यांनी फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.दुकानातून नेमका किती मुद्देमाल लंपास केला आहे याची माहीती पोलिस पंचनामा झाल्यानंतीच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या दिशांनी तपासाची चक्रे फिरवली असून चोरट्यांचा माग काढणे सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *