संस्थेच्या माध्यमातून विकासाचा दृष्टीकोन जोल्ले दांपत्यांना जमलाःप.पू.काडसिध्देश्वर महास्वामीजी-बीडीसीसी अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांचा वाढदिवस व हालसिध्दनाथ कारखाना गळीत हंगामाचा शुभारम संपन्न
निपाणी,ता.10(प्रतिनिधी)-
कांहि मंडळींनी दूरदृष्टी असते आणि कोणत्याही क्षेत्राला दिशा कशी द्यावी, प्रगती कशी करावी आणि सामान्य माणसाच्या विकासातून संस्था विकसीत व्हावी आणि संस्थेच्या माध्यमातून विकास कसा करावा यांचा मंंंत्र असतो, एक दृष्टीकोन असतो तो दृष्टीकोन जोल्ले दांपत्यांना जमला आहे. असल्याचे प्रतिपादन कणेरी मठाचे प.पू. काडसिध्देश्वर महास्वामीजी यांनी केले. ते श्री हालसिध्दनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंम आणि कारखान्याचे भाग्यविधाते बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या 64 व्या वाढदिनी आयोजीत कार्यक्रमात आशिर्वचन करताना बोलत होते.
प्रारंभी स्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते काटा पूजन, ऊस भरून आलेल्या बैलगाडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गव्हाणीचे पूजन, श्रीफळ वाढून गव्हाणीत ऊसाची मुळी टाकून गळीत हंगाम शुभारंम करण्यात आला. यांनंतर श्रीकांत बन्ने यांनी मान्यवरांचे स्वागत तर माजी अध्यक्ष एम.पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यांनंतर बिरेश्वर संस्था, कारखान्याच्यावतीने चेअरमन व संचालक मंडळातर्फे सत्कारमुर्ती अण्णासाहेब जोल्ले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तर कारखान्याला बेस्ट डिस्टलरी पुरस्कार मिळाल्याबद्दल संंगम कारखान्याच्या वतीने चेअरमन राजेंद्र पाटील व संचालकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना स्वामीजी म्हणाले, कारखाना बुध्दिहाळकर पाटील आणि शंकरानंदांनी कारखाना संंघषातून सुरू ठेवला. पण मध्यंतरी काळात बिकट अवस्थेत गेंला. यावेळी जोल्ले दांपत्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे कारखान्याची झेप घेत कारखान्याला उर्जिस्तावस्था आणली. अनेक वर्षाची कामगारांची समस्या होती रिटायर होवूनही परमनंट झाले नाहीत. कर्ज काढून कारखान्याच्या संंपतीत वाढ होत गेली. रोजगार वाढला, उत्पन्न वाढले यामधून कामगारांची आणि ऊस उत्पादकांची काळजी घेतली गेली. अण्णासाहेब जोल्लेंना दृरदृष्टी आहे. त्याच्या हाताला मोठे यश आहे, त्यामुळे त्यांनी भंगारातून सोने कमविण्याची दृष्टी मिळाली आहे. या कारखान्यात 35 हजार सभासद आणि 1100 कामगार आहेत. त्यांना 60 लाख देता. पण तीही अण्णासाहेबांना कमी वाटते ते 3 ते 4 कोटीची मदत कामगार आणि संभासदांना देवू इच्छित आहेत. कामगार आणि सभासदांच्या परिवाराच्या समाधानासाठी काम करण्यात त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकाररत्न अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे. पावसाची कमतेमुळे ऊसाचे क्षेत्र आणि वाढही कमी झाली आहे.कमी दिवस हंगाम चालणार असला तरी आमचे उदिष्ठ पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. 10 हजाराचे गाळप करीत 1.5 ते 2 लाख लिटर इथेनॉल निर्मीती करण्यात येणार आहे. 15 तारखेला गंळीत हंगामत सुरू होईल. तत्पूर्वी 12 तारखेला केंद्र शासन व शेतकरी संघटनेची बैठक होवून दर निश्चीत होईल. भागातील इतर कारखाने दर देतील त्यापेक्षा 10 रूपयें जादा देण्यात येईल. भागातील शेतकऱ्यांनी तोडणी वाहतूक यंत्रणा तयारी केली आहे. त्यामुळे नॉनस्टॉप 10 हजाराचे गाळप केले जाईल. दर 15 दिवसाला ऊस बिले दिले जातील. तोडणी-वाहतूकही वेळेत दिली जाईल.सभासद,कामगारांच्या मुलांना 60 लाखाची शिष्यवृती देण्यात येईल. सभासद साखर 50 किलो, टनेजला अर्धा किलो तर कामगारांना 25 किलो साखर दिली जात आहे. सिजनेबलसह कामगारांना बोनस, 20 हजार पेक्षा पगार कमी असणाऱ्यांना एक हजाराची वाढ तर इतरांना 10 टक्के पगार वाढ देण्यात येणार आहे. कामगारांच्या कुंटूबियासाठी 2 लाख वैद्यकिय मदत देण्यात येत आहे. कारखान्यातर्फे शेतकऱ्यांसाठी माती व पाणी परिपरिक्षण सुविधा उपलब्ध होत आहे. कारखान्याचे कर्ज 1000 कोटीचे असले तरी मालमता 800 कोटीची झाली आहे. कामगार आणि शेतकऱ्यांना जपण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड न करता सर्व ऊस आपल्याच कारखान्याला पाठवावा. साखरेचा दर वाढला आहे, त्यामुळे ऊसाची दर वाढणार आहे. सरकार ठरवेल त्यापेक्षा 10 रूपये जादा देण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले.
आम.शशिकला जोल्ले म्हणाल्या, अण्णासाहेब जोल्लेंचे आयुष्य संघर्षातून निर्माण झाले आहे. घरची पुण्याई आणि देवाची कृपादृष्टीमुळे त्यांना संघर्षाने यश मिळत गेले आहे. कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सभासद आणि कामगारांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच आज कारखान्यात चांगल्या वातावरणात काम करताना कामगारांना चांगले वाटत आहे. जनसेवा हीच जनार्दन सेवा म्हणून काम करीत असून सभासद व शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी चेअरमन जयकुमार खोत यांनी कारखान्याच्या प्रगतीत अण्णासाहेब जोल्लेंचे मार्गदर्शन महत्वाचे असल्याचे सांगितले. तर कामागार नेते अनिल शिंदे यांनी अण्णासाहेब जोल्ले यांनी कामगारांच्या सर्वच योजना दिल्याने कामगार युनियनच बंद केले असल्याचे सांगितले.
यावेळी प.पू. प्राणलिंग स्वामीजी, ज्योतीप्रसाद जोल्ले, कारखान्याच्या उपाध्यक्षा गिता पाटील, संचालक आप्पासाहेब जोले, विश्वनाथ कमते, अविनाश पाटील, रामगोंडा पाटील, पवन पाटील, समित सासणे, प्रकाश शिंदे, रमेश पाटील, रावसाहेब फराळे, शरद जंगटे, विनायक पाटील, सुहास घुगे, वैशाली निकाडे,राजू गुंदेषा, महालिंग कोठीवाले, रामगोंडा चौगुले, भरत नसलापुरे, आनंंदा यादव, देवाप्पा देवकाते,कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरगांवे, जैनवाडी येथील पार्श्वनाथ पीकेपीएस चे चेअरमन दिलीप खोत सर्व संचालक, प्रशांत केस्ती, विनायक खोत, सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटील भिवशी, माजी तालुका पंचायत सदस्य सदाशिव बुद्धिहाळे, तालुका मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कानडे, महात्मा बसवेश्वर सोहार्दचे सर्व संचालक, ज्योती मल्टीपर्पज निपाणी शाखा चेअरमन बंंडा घोरपडे, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा योगिता घोरपडे, प्रा.विभावरी खांडके, जय हनुमान संंस्थेचे चेअरमन संंजय स्वामी व सर्व संचालक तसेच एस. एस. ढवणे, संंगमचे उपाध्यक्ष बी.बी. पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुनिल पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


