न्यू कॉलेज ऑफ फार्मसी येथे वर्ल्ड फार्मासिस्ट डे आणि नॅशनल फार्मसी वीक निमित्त स्पर्धां

0
WhatsApp Image 2026-10-17 at 7.28.13 PM

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे न्यू कॉलेज ऑफ फार्मसी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, येथे ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे’ आणि ‘नॅशनल फार्मसी वीक – २०२६’ निमित्त संस्थास्तरीय विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावर्षी हा कार्यक्रम “स्वस्थ भारत: कॉम्बॅटिंग अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स” या विशेष संकल्पनेवर आधारित होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सृजनशीलतेला वाव देण्यासाठी संस्थेमार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

              यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन, दृश्यात्मक माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण, साय-टून्स स्पर्धा, विज्ञान आणि कार्टून्सची सांगड घालून सोप्या भाषेत माहिती देणे, रील मेकिंग स्पर्धा माहितीपूर्ण आणि प्रभावी छोटे व्हिडिओ तयार करणे. लीफलेट मेकिंग स्पर्धा आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणारी पत्रके तयार करणे. विजेत्यांना ४ नोव्हेंबर  रोजी ‘कृष्णाजी शेंगाडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे, पुणे’ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

        कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक प्रा. योगेश कोळेकर यांनी संस्थेचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. आर. व्ही. कुलकर्णी, प्रा. ए. एस. महाडिक, प्रा. के. आर. ताटे, प्रा. डी. एस. रावळ, प्रा. आर. के. गायकवाड, प्रा. एस. एस. माने, प्रा. वाय. एस. कोळेकर यांनी समन्वयक म्हणून विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांकडून या सर्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *