पथनाट्यातून डी. आर. के. आर्ट सर्कलची पदवीधर मतदारांना साद
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स चा सांस्कृतिक विभाग
कोल्हापूर. (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुका होत आहेत त्या अनुषंगाने मतदारांना जागृत करून मतदान करण्यासाठी देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स च्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने बिंदू चौक येथे पथनाट्य सादर करून पदवीधरांना मतदानाचे आवाहन करण्यात आले.
पथनाट्य मध्ये पदवीधर व शिक्षक मतदार म्हणून नोंदणी करणे, मतदार यादीतील नाव कसे शोधावे, मतदान कसे करावे आणि उमेदवाराकडून पैशाची नाही तर कामाची मागणी करून विधान परिषदेमध्ये आपला आवाज पोहोचवावा असा संदेश पथनाट्यातून दिला.
विद्यार्थी कलाकारांना प्रेरणा व मार्गदर्शन कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य अॅड. वैभव पेडणेकर, अॅड. अमित बाडकर, प्राचार्य डॉ. वर्षा मैंदर्गी, उपप्राचार्य कॅप्टन डॉ. आर. एस. नाईक, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.के. जी. कांबळे, प्रा. प्रविण सोरटे, प्रा. प्रतीक भस्मे, प्रा. प्रथमेश पोतदार, विशाल चव्हाण यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


