न्यू कॉलेज ऑफ फार्मसी व न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे भव्य गरबा-दांडिया उत्सव
पारंपरिक वेशभूषा, आकर्षक सजावट, पारंपरिक संगीत आणि गरबा-दांडियाच्या तालावर विद्यार्थ्यांनी आनंद लुटला
कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, आणि न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने गरबा-दांडिया उत्सव पार पडला. शैक्षणिक उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सांस्कृतिक सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या संचालिका श्रीमती स्वाती निगडे व श्रीमती सविता पाटील, न्यू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पारंपरिक वेशभूषा, आकर्षक सजावट, पारंपरिक संगीत आणि गरबा-दांडियाच्या तालावर विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. या उत्सवाला विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
00000

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या संचालिका श्रीमती स्वाती निगडे व श्रीमती सविता पाटील, न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार ,न्यू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांची प्रमुख उपस्थिती


