श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररीच्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

0
IMG-20261026-WA0070

मूकबधिर विद्यार्थ्यांसह विविध गटांतील गुणवंतांचा गौरव
मिरज (प्रतिनिधी)

श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कै. रा. वि. भिडे मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसह विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

संस्थेचे अध्यक्ष सुरेश बापू आवटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. मूकबधिर गटात सोनम गजानन पाटील प्रथम, अलिशान सचिन कांबळे द्वितीय, साक्षी बिरादरी भेसूर तृतीय, तर कार्तिका रावसाहेब होनमोरे उत्तेजनार्थ विजेती ठरली.

मोठ्या गटात श्रेयसी राजाराम येवारे प्रथम, आसमा अन्वर सौदागर द्वितीय, अनंत बाकेबिहारी शर्मा तृतीय, तर दिव्या भाऊसाब वाटेकरी हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. लहान गटात मंतशा जावेद भंडारी प्रथम, स्वराजंली दीपक हंकारे द्वितीय, मिता जगदीश धुळुबुळू तृतीय, तर अमुक अमुलवरा अल्ताफ अत्तार हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. यावेळी उपाध्यक्ष विजयराव गाडवे, कार्यवाह डॉ. प्रतापराव भोसले, खजिनदार बाळासाहेब अस्वले, सुनील मोतुगडे, गजानन पिसे, सतीश हंबर, राजाराम येवारे, दीपाली जठार, मंजुषा डोंगरे व अजय खोंद्रे उपस्थित होते. डॉ. भोसले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *