मिरजेत रमा उद्यान येथे वृद्धाची आत्महत्या ; पोलिसांकडून तपास सुरू

0
WhatsApp Image 2026-10-29 at 9.55.20 PM

मिरज (प्रतिनिधी)
शहरातील रमा उद्यान परिसरातील समृद्धी कॉलनी येथे बाळासाहेब बांगर (वय ५५) यांनी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२८) रोजी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बांगर यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पती-पत्नीमध्ये वाद झाल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू होती. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळास भेट देत पुढील तपास सुरू केला. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच चांगले घर बांधून बांगर कुटुंबीय येथे राहण्यास आले होते. पूर्वी ते मंगळवार पेठ येथे भाड्याने राहण्यास होते. या घटनेमुळे समृद्धी कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *