राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

0
WhatsApp Image 2026-11-02 at 4.39.34 PM

माजी विद्यार्थी मेळाव्याचे प्रमुख पाहुणे व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा. खासदार धनंजय महाडिक आपले महाविद्यालयीन जीवनातील अनुभव कथन करताना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज व राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित होते. तर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एम. बी. शेख हे होते. 

      खासदार धनंजय महाडिक यांनी आपला शैक्षणिक प्रवास उलघडून दाखवला. मेळाव्याच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ. डी. आर. भोसले यांनी महाविद्यालयातील कामकाज आणि भविष्यातील महाविद्यालयातील भौतिक सुविधा या अनुषंगाने माजी विद्यार्थ्याशी संवाद साधला.

      माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी माजी विद्यार्थी संघटनेची भूमिका कथन केली. सत्यजित (नाना) कदम, बी. एच. पाटील, संभाजी पाटील, गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, नंदिनी पाटील, डॉ. भारत भूषण माळी या माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी जाग्या केल्या. 

     या प्रसंगी डॉ. राजकुमार वायंगडे, डॉ. संतोष बिरनाळे, डॉ. अक्षय भोसले, पियुष रूकडीकर, नीतू मोल, अतुल जाधव, महाविद्यालयास कुलर, प्रिंटर भेट देणारे माजी विद्यार्थी, देणगीदार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *