मिरजेत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर मोहीम; ट्रॅक्टर-ट्रॉलींना रेडियम स्ट्रीप लावणे बंधनकारक

0
WhatsApp Image 2026-11-20 at 2.14.37 PM

मिरज (प्रतिनिधी)
ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर व रेडियम स्ट्रीप लावण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली तसेच इतर वाहने वाहनचालकांना सहज दिसावीत आणि संभाव्य अपघात टाळता यावेत, हा या मोहिमेचा उद्देश आहे.

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींना रिफ्लेक्टर व रेडियम स्ट्रीप लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, मिरज शहरात सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली व ट्रकच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास न देणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट, तर चारचाकी चालकांनी सीटबेल्टचा वापर करणे, मद्यपान करून किंवा अतिवेगाने वाहन न चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक टाळणे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक रणजीत तिप्पे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *