मिरज प्रभाग ३ मधील रस्ते विकासाला गती; १ कोटी १७ लाखांच्या कामाचा शुभारंभ

0
suresh khade

आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पिताश्री घर ते स्मशानभूमी ओढापर्यंतच्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणास प्रारंभ

मिरज (प्रतिनिधी)

शहरातील प्रभाग क्र. ३ मधील पिताश्री घर ते स्मशानभूमी ओढापर्यंतच्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी १ कोटी १७ लाख ७८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

मिरज शहरातील मूलभूत नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी आमदार खाडे यांच्याकडून विविध विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. हॉटमिक्स डांबरीकरणामुळे रस्त्याची गुणवत्ता सुधारण्यासह परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसेच दळणवळणाच्या सुविधांना चालना मिळणार आहे.

शहरातील प्रत्येक प्रभागात दर्जेदार रस्ते आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत असून, प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. राणी भोरे, नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक संदीप आवटी, दिगंबर जाधव, योगेंद्र थोरात, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *