मिरजेत पद्मावती फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबीर ; विवेक शेटे यांच्या पुढाकाराने आयोजन

0
bandushete

सन्मती वात्सल्य संस्थेला ५१ हजारांची आर्थिक मदत सुपूर्द

मिरज (प्रतिनिधी)
पद्मावती शांतीसेवा फाउंडेशनच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात १३५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. फाऊंडशनचे अध्यक्ष विवेक ऊर्फ बंडू शेटे यांच्या पुढाकाराने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी मिरज सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी निवेदिता बहनजी व उर्मिला बहनजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी विलास देसाई, डॉ. सुधन्वा फाटक, किरण भुजुगडे, कलाप्पण्णा लट्ठे, रविकांत अटक आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरात वसंतदादा पाटील रक्तपेढी, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी, सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल रक्तपेढी यांनी रक्तसंकलन केले. याप्रसंगी सन्मती वात्सल्य संस्थेला विवेक शेटे यांच्या वतीने ५१ हजार रुपयेचा धनादेश प.पू. श्री १०८ आचार्य विदेहसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत संस्थेच्या कार्यकारिणीकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *