‘त्या ‘ शिक्षकांवर तत्काळ कारवाई करा

कोचिंग क्लासेस वेल्फेअर असोसिएशनची मागणी
कोल्हापूर (प्रतिनिधी)
कोल्हापूर मधील एस. एम. लोहिया व पद्माराजे ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक खाजगी क्लासेस घेतात अशी तक्रार आज कोचिंग क्लासेस वेल्फेअर असोसिएशन तर्फे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबेकर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
यावेळी शिष्टमंडळाने शिक्षक असतानाही खाजगी क्लास चालवणे हा गुन्हा आहे यामुळे इतर कोचिंग क्लासेस वर याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे अशा शिक्षकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. एस . एम.लोहिया व पद्माराजे ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक श्री ओंकार किरण काळे (एस एम लोहिया कॉलेज),श्री उत्कर्ष शर्मा (पद्माराजे ज्युनिअर कॉलेज)आणि श्री अनिल सूर्यवंशी (एस.एम.लोहिया ज्युनिअर कॉलेज हे तीन शिक्षक कायमस्वरूपी शासकीय सेवेत आहेत असे असताना त्यांनी प्रबोधनी अकॅडमी मध्ये एस. एम लोहिया व पद्माराजे ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना आम्ही स्वतः तेथे शिकवणार आहोत असे सांगून त्या क्लासमध्ये विद्यार्थी समाविष्ट केले जातात हे शिक्षक शासनाच्या मान्यता प्राप्त पदावर कार्यरत असून त्यांना शासन घोषित संपूर्ण फायदे मिळतात असे असतानाही हे शिक्षक विद्यार्थ्यांना शेजारील प्रबोधिनी क्लासेस मध्ये शिकवतात आणि शासकीय पैशाचा अपहार करतात तरी संबंधित शिक्षकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी कोचिंग क्लासेस वेल्फेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिठमंडळात चंद्रकांत यादव, कोचिंग क्लासेस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष उदय शीपेकर, शहराध्यक्ष नारायण निरपणकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश ननवरे,बी. एम .पाटील, विद्यानंद उपाध्ये, संदीप सुतार, प्रकाश मोरे, संभाजी सावंत, राहुल टेकाळे, अतुल निंगुरे, अभिजीत पायमल,अमित निगवेकर,किरण मोळे,हर्षल धायगुडे विशाल ढोबळे, सुरेश देसाई आदींंचा समावेश होता.