मनपा जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये कमला कॉलेजचे यश

ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्या तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य मोहन जाधव, लेफ्टनंट ज्योती लेंगरे, पूजा ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूर. (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे वतीने आयोजित विभागीय क्रीडा संकुल, संभाजीनगर, कोल्हापूर येथे झालेल्या मनपा जिल्हास्तरीय 19 वर्ष मुली खो-खो स्पर्धेमध्ये कमला कॉलेजच्या कनिष्ठ विभागातील कबड्डी संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेमध्ये उप-उपांत्य फेरीचा सामना राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, जुना बुधवार, कोल्हापूर यांच्यासोबत 1 मिनिट 21 सेकंदामध्ये दोन गुणांच्या फरकाने जिंकला, तसेच उपांत्य फेरीचा सामना न्यू मॉडेल कॉलेज कोल्हापूर सोबत दोन मिनिटं वीस सेकंदामध्ये चार गुणांच्या फरकाने सामना जिंकला अंतिम फेरीत संघ दाखल झाला. मेन राजाराम कॉलेज कोल्हापूरच्या संघासोबत अंतिम सामना झाला.
कमला कॉलेजच्या खो-खो संघामध्ये कर्णधार वैभवी येडूरकर, संचिता सावंत, अनुष्का पाटील, सिद्धी शिंदे, तेजस्वीनी व्हनमोरे, चैतन्य पेडणेकर, प्रणाली ढाले, शेजल चव्हाण, स्मिता वासुदेव, रिद्धी शिंदे, दिपाली कांबळे, प्राची गोसावी, प्रिया जावळीकर, भक्ती सुगतेकर, नेहा साठे या खेळाडूंचा समावेश होता. या संघातील वैभवी येडूरकर व संचिता सावंत या दोन खेळाडूंची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूस ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्या तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य मोहन जाधव, लेफ्टनंट ज्योती लेंगरे, पूजा ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.