पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटूबियांना विमा रकमेचा धनादेश

हळदी /प्रतिनिधी, भैरवनाथ विकास सेवा संस्था गाडेगोंडवाडी चे कारभारवाडी गावचे सभासद असलेले शेतकरी प्रदीप तुकाराम पाटील यांचा काही दिवसांपूर्वी पुराच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा म्हणून दोन लाख रुपयांच्या विमा रकमेचा धनादेश प्रदान करण्यात आला.
हा धनादेश के.डी.सी.सी. बँकेचे संचालक राजेश पाटील (सडोलीकर) यांच्या हस्ते प्रदीप पाटील यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी भैरवनाथ विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष कृष्णात बुडके, उपसरपंच तेजस्विनी पाटील, निवास पाटील, नलिनी पाटील, बँक निरीक्षक मनोज गुजर, सचिव अशोक साळोखे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.