ए.आय. तंत्रज्ञानात गणित विषयाचे महत्त्व मोठे  – डॉ. व्ही. एम. पाटील

0
ए.आय. तंत्रज्ञानात गणित विषयाचे महत्त्व मोठे - डॉ. व्ही. एम. पाटील

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान विभागाच्या उपप्राचार्य, डॉ. पी. बी. पिस्टे

कोल्हापूर.(प्रतिनिधी) आजच्या घडीला मानवी जीवनातील असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर दिसत नाही. त्यामुळे आजच्या युगाला ए. आय. चे युग म्हणावे लागते. ह्या ए. आय. ला  अधिक विकसित करण्यामध्ये  गणित ह्या विषयाचे  महत्त्व मोठे असल्याचे मत न्यू कॉलेजचे प्राचार्य, डॉ. व्ही. एम. पाटील यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छ. शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय अग्रणी महाविद्यालय कार्यशाळेत बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान विभागाच्या उपप्राचार्य, डॉ. पी. बी. पिस्टे ह्या होत्या.  

     कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. पिस्टे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात अनेक नैसर्गिक आपत्तीमध्ये मानवी जीवनाचे अतोनात नुकसान होऊ लागले, शेतीतून अपेक्षित उत्पन्न प्राप्तीला मर्यादा पडल्या आहेत. अशा अवस्थेमध्ये ए. आय. शेतीच्या उत्पन्न वाढीस चालना देऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले. ह्या कार्यशाळेस तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून  शिवाजी विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागाचे प्रा. पी. टी. गोयल, गणित विभागाचे डॉ. जे. टी. भोसले व विवेकानंद कॉलेजचे गणित विभागाचे प्रा. एम. ए. जाधव हे उपस्थित होते. 

   शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी योजनेअंतर्गत  अग्रणी महाविद्यालय न्यू कॉलेज यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा संपन्न झाली. ह्या कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डी. आर. भोसले, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. ए. पी. उबाळे, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या, प्रो. एम. बी. देसाई, आयक्युएससी प्रमुख डॉ. यु. एस. शेळके व कोल्हापूर परिसरातील अग्रणी महाविद्यालयातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यशाळेचे  प्रास्ताविक प्रा. शुभम शेडगे, सूत्रसंचालन डॉ. बी. बी. घुरके तर आभारप्रदर्शन प्रा. झेड. जे. शेख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *