न्यू कॉलेज, येथे ग्रंथप्रदर्शन संपन्न

कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, प्रा.डॉ. ए.एन. यादव, प्रा. डॉ. अनिल सुर्यवंशी, प्रा.के.डी .कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.संदीप जाधव.
कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज, कोल्हापूरच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने “ग्रंथप्रदर्शन 2025” हा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या प्रदर्शनाचे उदघाटन प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी नॅक समन्वयक प्रा. डॉ. एन. व्ही. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा. डॉ. आर. पी. आडाव यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला .प्रा. डॉ. आर. पी. आडाव यांनी ग्रंथप्रदर्शनाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, विविध विषयांवरील दर्जेदार साहित्याशी त्यांची ओळख करून देणे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करणे.विद्यार्थ्यांना नवीन ग्रंथांची ओळख होते आणि ज्ञानाच्या क्षितिजांचा विस्तार होतो” हे या प्रदर्शनामागचे मुख्य ध्येय आहे.
उदघाटक डॉ. व्ही. एम. पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “ग्रंथालय हे ज्ञानाचे खरे केंद्र आहे. आजच्या डिजिटल युगातही पुस्तकांची आणि मुद्रित माहितीची उपयुक्तता कमी झालेली नाही. ग्रंथप्रदर्शनासारखे उपक्रम वाचनसंस्कृती दृढ करतात आणि विद्यार्थ्यांना सर्जनशील विचार करण्याची प्रेरणा देतात.”
या प्रदर्शनात विविध विषयांवरील नामांकित लेखकांचे ग्रंथ, संशोधन संदर्भ ग्रंथ, चरित्रे, विज्ञान, साहित्य, समाजशास्त्र, इतिहास, तसेच स्पर्धा परिक्षा, करिअर व कौशल्य विकासाशी संबंधित पुस्तके प्रदर्शित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. ए.एन. यादव, प्रा. डॉ. अनिल सुर्यवंशी, प्रा.के.डी .कांबळे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.संदीप जाधव , प्राध्यापक , अनेक विद्यार्थी वाचक आणि ग्रंथप्रेमींनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रंथालय स्टाफ,ग्रंथालय समिती सदस्य, विद्यार्थी , तसेच विभागातील सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.