कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

0
IMG-20250301-WA0008

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध उपकरणांतून दाखविले कलाविष्कार

सांगली (प्रतिनिधी)

संजयनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ॲड.अजित सूर्यवंशी व शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.या निमित्ताने पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन व्यवहाराशी सांगड घालून विज्ञान उपकरणे तयार केली होती. त्या उपकरणांच्या मांडलेल्या प्रदर्शनास अनेक विज्ञानप्रेमींनी भेट देऊन प्रतिसाद दिला.

या प्रदर्शनामध्ये मुख्यत्वेकरून ऊर्जा बचत व जल शुद्धीकरण, धुम्रपानामुळे कॅन्सर कसा होतो, एटीएम मशीन, मिनी रूम हिटर, मानवी शरीर रचना व कार्य,फायर अलार्म, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ठिबक सिंचन यांसारख्या बऱ्याच उपकरणांमुळे पालकांचे मनोरंजन तर झालेच पण एक सामाजिक पर्यावरण बचावसारखा संदेश देण्याचा प्रयत्न या लहान चिमुकल्यांनी केला.

कार्यक्रमाचे संयोजन विज्ञान विभाग प्रमुख हुसेन मगदुम, शिक्षिका पूजा करांडे, सुप्रिया पाटणकर, ऋतुजा कदम ,नीलम कंदी यांनी केले.यावेळी पर्यवेक्षिका संगीता सरगर, अश्विनी मनवे,रेश्मा मुल्ला,स्वाती चौगुले,सीमा माळी, कविता काळे,संजीवनी देशमुख, पद्मा होडगे, आनंदी सावंत, नूरजहा खान, श्रद्धा बर्गे, सुप्रिया पाटील, स्मिता टिवले, वाघमोडे सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. शाळा समिती सदस्य पालक समिती, माता, पालक समिती सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *