करजगी प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ; मदनी ट्रस्टची मागणी

0
481220893_9254809841305833_8055624768225634777_n

सांगली (प्रतिनिधी)
जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला होता. हा खटला न्यायालयात सुनावणीस येण्यापूर्वी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर विभागीय परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी खा. विशाल पाटील उपस्थित होते.

मदनी चॅरिटेबल ट्रस्टने सांगली बार असोसिएशनकडेही नराधमाचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये, अशी विनंती करणारे निवेदन दिले होते. पोलीस प्रशासनातर्फे आरोपीवर अवघ्या तेरा दिवसात आरोपपत्र दाखल करुन लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. याप्रसंगी महानिरीक्षक फुलारी यांनी याप्रकरणात कोणतीही कसर न ठेवता न्यायालयात आरोपीस फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली. यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफीयान पठाण, मौलाना साहिल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *