सांगली-मिरज रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम तातडीने होणे गरजेचे – समित कदम

0
WhatsApp Image 2025-04-29 at 9.25.46 PM

जनसुराज्यकडून मंत्री शिवेंद्रराजेंकडे यासंदर्भात लेखी निवेदन

मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
सांगली-मिरज रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजित असलेल्या मारुती मंदिर शेजारील उड्डाण पुलाचे काम सुरु होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन या प्रश्नाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.

वाहतुकीचा मोठा भार या मार्गावर असून, उड्डाण पुलाचे काम सुरू करताना सुरुवातीला पर्यायी पुलाची उभारणी करणे आवश्यक आहे. अन्यथा वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर या कामाची सुरुवात करून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असल्याचे समित कदम यांनी निवेदनात म्हटले आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ही यासंदर्भात तत्परतेने सहकार्य करू अशी ग्वाही दिली आहे.

उड्डाण पुलामुळे वाहतुकीचा भार कमी होणार असून, अपघातांचा धोका देखील कमी होईल. सांगली मिरज रोडवरील जुना पूल बऱ्याच ठिकाणी ढासळत चालला आहे. त्यामुळे उड्डाण पुलाचे काम तातडीने हाती घेणे अत्यंत आवश्यक असल्याने समित कदम यांनी याबाबत आग्रही भूमिका घेतलेबद्दल नागरिक व प्रवाशांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *