“आरोप सिद्ध करा, राजीनामा देतो” – नगराध्यक्षा सोनल कोठडीयांचा खुला इशारा

अशोक नगर जमीन प्रकरण,
आरोप सिद्ध केल्यास राजकीय संन्यास घेण्याची तयारी -विलास गाडीवडर
निपाणी, (प्रतिनिधी)
अशोक नगर येथील जागेचा खटला मागे घेण्याच्या बाबतीत आमच्या नेत्या माजी मंत्री आम. शशीकला जोल्ले, माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले किंवा आपल्या सत्ताधारी गटाचा संबंध नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्यानी पुराव्यानिशी सिद्ध करावे आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे मत नगराध्यक्षा सोनल कोठडीया यांनी व्यक्त केले. नगरपालिका नगराध्यक्ष कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तर यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले, अशोकनगर जागेच्या बाबबतीत पालिका आयुक्तांनी न्यायालयात हजर होवून केस मागे घेतली ही बाब समताच तात्काळ याविषयीची ठाम भूमिका मांडली. नगराध्यक्षांनी सत्ताधारी गटाच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत घेवून आपण यामध्ये सहभागी नसल्याचे सांगितले.
त्यानंतर आयुक्तांना जाव विचारून सदर मागे घेतलेला खटला पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी दिली. त्यानुसार आयुक्त प्रक्रिया करीत आहेत. लवकरची त्याची माहिती जाहिर करू. पण गेल्या ७ दिवसांपासून हे प्रकरण सर्वत्र चर्चेत असताना मात्र, विरोधी पक्षाने झोपेचे सोंग घेतले होते. कारण, त्यांचे जे नेतृत्व करतात तेच त्यामध्ये फसले आहेत. माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या सुनबाई शुभांगी जोशी यांच्या नगराध्यक्ष कार्यकाळात त्या हायकोर्टात जाऊन तत्कालीन आयुक्त कैंप हनुमय्या यांच्यासमवेत समझोता करार केला आहे. त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अशोक नगर जागेतील ४३ हजार स्केअर फुट पैकी ३०००० स्केअर फुट जागा मालकाला व १३००० स्क्वेअर फुट नगरपालिकेस अशा प्रकारचा तो समझोता केला होता. त्यामुळे त्यांनी थांबविल्यामुळे विरोधकांनी आवाज उठविला नाही काय. नगरपालिकेचा कारभारी आपणच पाहतो हे सर्वमान्य आहे. कारण अनेकजणांनी आपल्या नेतृत्वात अनेक वर्ष काम केले आहे. आपणच शुभांगी जोशींनी हायकोर्टात केलेला करार रद्द व्हावा यासाठी हायकोर्टात चॅलेंज करून सदर प्रकरण निपाणी न्यायालयात आणले होते. त्यांच्या कार्यकालानंतर आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत हाय कोर्टात विनंती करून तो खटला सुरू केला.

आम. शशिकला जोल्ले या सन २०१९ ते २३ या काळात राज्याच्या मंत्रीपदावर होत्या. त्यांना हे काम करायचे असते तर त्यांनी अधिकार काळातच केले असते. असल्या किरकोळ कामात त्यांनी लक्ष घातले नाही. मन हलके करून विरोधकांच्या नेत्यांनी समझोता करार केला. दुसऱ्यावर आरोप करताना त्यांनी आधी स्वतःला तपासावे या प्रकरणाशी आमदार व माजी खासदार यांचा कोणताच संबंध नाही. याउलट राज्यात सत्तेत असणाऱ्या लोकांची निपाणी नगरपालिकेत फार लुडबूड चालू असून हे त्यांचेच कारस्थान असावे. नगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप करीत आम्ही कमी केलेल्या कामगारांना दबाव तंत्र वापरून पुन्हा कामावर रुजू करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांनीच प्रशासनावर दबाव आणून याप्रकरणी जनतेच्या बाजूने काम करावे. दोषी समोर येईलच. त्यामुळे विरोधकांनी केवळ पोकळ आरोप न करता ते कागदपत्रांनिशी सिद्ध करून दाखवावे केवळ राजीनामा नाही; तर, आपण राजकारणातून संन्यास घेऊ असे सांगतानाच त्यांनी त्यांच्याच पक्षातून अखेरपर्यंत काम करावे, वेळप्रसंगी गट बदलू नये. त्यांचे अर्धे पाय काँग्रेसमध्ये तर अर्धे पाय राष्ट्रवादी मध्ये आहे. त्यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. आरोप सिद्ध करता येत नसेल नसेल तर त्यांनी संन्यास घेण्याचे धाडस दाखवावे, असेही विलास गाडीवड्डर यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष संतोष सांगवकर, सभापती डॉ. जसराज गिरे, राजू गुंदेशा, सुजाता कदम, रवि इंगवले, अभिनंद मुदकुडे, विजय टवळे, राजेश कोठडीया, रवि कदम, सागर मिरजे, प्रणव मानवी, सुरज खवरे आदींची उपस्थिती होती.