खडतर परिश्रम घेऊन यशस्वी व्हा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

तालुका कृषी रोपवाटिकेला भेट दिली, यावेळी त्यांनी विविध फळझाडांच्या व केशर आंबा लागवडीची माहिती घेतली
कोल्हापूर ( प्रतिनिधी) : आपल्यातील कलागुण व कौशल्य ओळखून त्याचा विकास करा. अवांतर वाचन करा. सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक ज्ञान ग्रहण करण्यासाठी करा. जीवनात ध्येय निश्चित करा आणि खडतर परिश्रम घेऊन यशस्वी व्हा, अशा शब्दांत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिरोळ तालुक्यातील जनतारा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत यशस्वी झालेले 42 विद्यार्थी तसेच गायन व स्पोर्ट्समधील यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी स्पर्धा परीक्षा तसेच करिअर बाबत मार्गदर्शन केले. यावेळी जनतारा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते. दरम्यान हरोली येथे सुरु करण्यात आलेल्या नवीन अभ्यासिकेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हरोलीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच त्यांनी तालुका कृषी रोपवाटिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध फळझाडांच्या व केशर आंबा लागवडीची माहिती घेऊन आंबा विक्रीत वाढ करण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शिरोळ तहसीलदार अनिल कुमार हेळकर, उपविभागीय व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
*****