बसस्थानकात दागिने चोरणाऱ्या दोन महिला गजाआड ; १ लाख २८ हजारांचे दागिने जप्त

0
IMG-20250829-WA0220

सांगली (प्रतिनिधी)

शहरातील मुख्य बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे १ लाख २८ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. वनिता दिलीप लोंढे (वय ४२, रा. गैंगवाडी, ता. बैलहोंगल, जि. बेळगाव, कर्नाटक), गंगा सुरेश शिंदे, (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

अधिक महिती अशी कि, दि.१९ मे रोजी सांगली स्थानकावर अर्चना हनमाने यांच्या बॅगेतून दागिने चोरीला गेले होते. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चोरट्याना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते. पथकातील अभिजित माळकर यांना बस स्थानकावर दागिने चोरणाऱ्या महिला त्रिकोणी बागेजवळ चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला.माहितीप्रमाणे दोन महिला तेथे आल्यावर त्यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केल्यावर त्यात दागिने सापडले.त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्यांनी सांगली बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेच्या बॅगेतील दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून दागिने जप्त करण्यात आले. दोघीना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहायक निरीक्षक रुपाली बोबडे, उपनिरीक्षक कुमार पाटील, स्वप्ना गराडे, आमसिध्द खोत, संदीप पाटील, प्रकाश पाटील, सुनिता शेजाळे, दुर्गा कुमरे, प्रतिक्षा गुरव, अभिजीत माळकर, ऋषिकेश सदामत,रोहन घस्ते, सुमित सुर्यवंशी, गणेश शिंदे, सायबर पोलीस अभिजीत पाटील यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *