भाजपा आष्टा मंडल अध्यक्षपदी अमोल पडळकर यांची निवड

आष्टा प्रतिनिधी (डॉ. तानाजी टकले)
सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुलदादा महाडिक यांचे कट्टर समर्थक, आष्टा नगरीचे माजी नगरसेवक अमोल पडळकर यांची भारतीय जनता पार्टीच्या आष्टा मंडल अध्यक्षपदी निवड झाली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते अमोल पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राहुलदादा महाडिक, शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अमोल पडळकर यांचे आष्टा शहरातील राजकीय सामाजिक कार्य उत्कृष्ठ असे आहे. ते भाजपाचे राहुल महाडीक, सम्राट महाडीक यांचे कट्टर समर्थक आहेत. महाडीक युवा शक्तीच्या वतीने त्यांनी युवकांसाठी दहीहंडी म्होत्सवाचे आयोजन केले आहे. महिलांसाठी विविध स्पर्धा, कार्येक्रमांचे आयोजन केले जाते. अमोल पडळकर यांनी पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी विरोधात विरोधकांची मोट बांधित आष्टा शहर लोकशाही विकास आघाडीची स्थापना करीत 2016 ची निवडणूक लढवली.
ते आष्टा पालिकेचे माजी नगरसेवक आहेत. लोकशाही विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या प्रश्नावर आवाज उठवीत पालिकेसमोर आंदोलने उपोषणे केली आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडविले आहेत. राहुल महाडीक यांच्यासोबत त्यांनी भाजपात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत खा.धैर्यशील माने यांच्या विजयासाठी योगदान दिले. भाजपा सदस्य नोंदणीत चांगले काम केले. या कामाची दखल घेत भाजपने त्यांच्यावर आष्टा मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांचे आष्टा शहरात सर्वत्र अभिनंदन होतं आहे.
अमोल पडळकर म्हणाले, आमचे नेते राहुल महाडीक, सम्राट बाबा महाडीक यांच्या नेतृत्वाखाली आष्टा मंडल स्थरावर कार्येकर्त्यांची मोट बांधित भाजपाची ताकद वाढवू. सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहू. तरुणांनी भाजपाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचवावीत.