आष्ट्यात ज्योतिर्लिंग चौक व दरोजबुवा चौक नामकरण फलकाचे उद्घाटन

आष्टा (प्रतिनिधी)
आष्टा येथील दरोजबुवा व ज्योतिर्लिंग चौकाच्या नामफलकाचे अनावरण प्रयोगशिल शेतकरी तानाजीराव चव्हाण यांच्याहस्ते झाले. शिवसेनेचे नगरसेवक वीर कुदळे यांच्या संकल्पनेतुन ग्रॅनाइटचा नामफलक उभा करण्यात आला आहे. या परिसरातील अनेक नागरिक, व्यापारी, व्यावसाइकांची बऱ्याच वर्षापासून दरोजबुवा व ज्योतिर्लिंग चौकाच्या नामफलकाची मागणी होती. आष्टा नगरपालिकेकडे अनेकवेळा निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. या प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक वीर कुदळे यांनी हा फलक उभा करून मागणी पूर्ण केली.
यावेळी उद्योजक नितीन झंवर, शैलेश सावन्त,अशोक मगदुम सावकर, विराज शिंदे, विवेक महाजन, डॉ. सतिश बापट, माजी नगरसेवक अमोल पडळकर, तालुका उपप्रमुख दिलीप कुरणे, राजकेदार आटुगडे, सुरज उंडाळे, अजय महाजन, अभिजित बिरनाळे, सुभाष मळणगांवकर, धवल पाटील, मिलींद गोखले, प्रमोद महाजन, कृष्णा पिसे, संभाजी माळी, जनगोंडा पाटील,समीर गायकवाड, शैलेश शहा इत्यादी मान्यवर बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.