सुशांत खाडे युवा मंचच्या अमननगर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)
येथील सुभाषनगर (अमननगर) येथे युवा नेते सुशांतदादा खाडे युवा मंच कार्यालयचे उद्घाटन सुशांतदादा खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी खाडे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार पश्चात ते म्हणाले, सुभाषनगर भागात भारतीय जनता पक्षाचे कार्यालय नसल्याने येथील नागरिकांना खुप हेडसांड करावी लागत होती. तरी आता आमच्या या भागातील नागरिकांना कसलीही अडचण निर्माण झाली तर थेट आमच्या या कार्यालयात संपर्क साधावा, आम्ही तत्परतेने सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, भाजप तालुका अध्यक्ष मयूर नाईकवाडे, मुसा गोदड, भाजप तालुका दक्षिण मंडलचे अध्यक्ष अभिजित गौराजे, संस्थापक अध्यक्ष नईम बावा, अध्यक्ष जुबेर कलंगडे, संदीप चव्हाण, उपाध्यक्ष नदीम बावा, उपाध्यक्ष किरण शिंदे,सुहास पाटील व विनायक माळी तसेच परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.