मिरजेत “फास्ट फूड स्टॉल लघु उद्यमी” ही १२ दिवसीय मोफत प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात
पाणीपुरी, भेळपुरी, दहीपुरी, शेवपुरी, कचोरी, गोबी मंचुरियन यासह विविध पदार्थ बनवण्याचे देण्यात आले प्रशिक्षण
मिरज (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील युवक-युवतींना आत्मनिर्भर होऊन कुशल उद्योजक बनविण्यासाठी स्टार ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था सांगली (आरसेटी) मिरज येथे १२ दिवसीय “फास्ट फूड स्टॉल लघु उद्यमी” या मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले गेले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली व बँक ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले.
ग्रामविकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही हे लक्षात घेवून ग्रामीण भागात उद्योग चालना देण्यासाठी तसेच अल्पउत्पन्न धारक युवक युवतींना ग्रामीण भागात उद्योग व्यवसायाला चालना देण्याचा ह्या प्रशिक्षण कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे. या प्रशिक्षणात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेला सर्व अभ्यासक्रम जसे कि पाणीपुरी, भेळपुरी, दहीपुरी, शेवपुरी, चाट आणि मसाला तयारी, कचोरी, गोबी मंचुरियन, बेबी कॉर्न मंचुरियन, ओनियन पकोडा, खेकडा भजी, बांगडी भजी, बनाना भजी, चिली पकोडा, पोटेटो पकोडा, बिर्याणी, पुलाव, कर्ड राईस, नुडल्स, चाऊमीन, पिझ्झा, बर्गर, सँडविच, कटलेट, समोसा, पावभाजी, भटुरा, वडा पाव, फ्रेंच फ्राईज, गार्लिक टोस्ट, सॉस आणि मेयोनीज, गोबी चिली, चिली चिकन, फ्राईड राईस व्हेज-नॉनव्हेज, चिकन आणि अंड्याच्या विविध पाककृती, रोझ मिल्क, मसाला मिल्क, कुल्फी वरील सर्व पदार्थांचे थेरी, डेमो आणि प्रात्यक्षिके तसेच व्यक्तिमत्त्व विकास, उत्तम संभाषण कौशल्य, उद्योजकीय सक्षमता, बँकेचे व्यवहार, विपणन व्यवस्थापन, विविध शासकीय योजने बाबत माहिती आणि मार्गदर्शन केले गेले.
या कार्यक्रमासाठी सांगलीचे माजी अग्रणी जिल्हा प्रबंधक राजेंद्र यादव, परीक्षिका सौ. तृप्ती दिंडे, फास्ट फूड स्टॉल लघु उद्यमी या विषयाच्या प्रशिक्षिका सौ. चारुलता कुलकर्णी, संस्थेअंतर्गत सुरु असलेल्या “मोफत महिलांसाठी वस्त्रालंकार / फॅशन डिझाईन” प्रशिक्षणाच्या प्रशिक्षिका सौ. शीतल देसाई, आर्थिक साक्षरता केंद्र प्रमुख दीपक क्षिरसागर, आरसेटी चे संचालक महेश पाटील, प्रशिक्षक प्रदीप साळुंखे आणि प्रवीण पाटील तसेच आरसेटी स्टाफ उपस्थित होता. संचालक महेश पाटील यांनी संस्थेअंतर्गत घेण्यात येणारे पुढील प्रस्तावित प्रशिक्षण कार्यक्रम जसे कि मोफत पापड, लोणचे व मसाला पावडर बनवणे, सेल फोन/मोबाईल दुरुस्ती आणि सेवा, टू व्हिलर मेकॅनिक वर्क आणि मशरूम/अळंबी लागवड या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.