12 कोटीतून काडापूर परिसरातीलविकासकामे पूर्णत्वाकडे ः आम. प्रकाश हुक्केरी
12 कोटीतून काडापूर परिसरातीलविकासकामे पूर्णत्वाकडे ः आम. प्रकाश हुक्केरी

चिक्कोडीप्रतिनिधी)-
काडापूर गावच्या कार्यक्षेत्रात माझ्या तसेच स्थानिक आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नांतून 12 कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत अशी माहिती विधान परिषद सदस्य व राज्य सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी दिली.काडापूर येथे स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन करून ते बोलत होते.
श्री. हुक्केरी म्हणाले, बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संस्थांच्या इमारतींच्या बांधकामासाठी 36.10 लाख रुपयाचा निधी मंजूर असून, ही बांधकामे पूर्ण झाली आहेत. बसवेश्वर प्राथमिक कृषी संस्थेच्या इमारतीसाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन बांधकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय विविध रस्ते व गटार कामांसाठी 80 लाख निधी मंजूर केला आहे. ग्रामपंचायतीमार्फत हनुमान मंदिर ते अंकली रस्त्यापर्यंत रस्ता रुंदीकरण व पथदिवे बसविण्यासाठी 1 कोटी 50 लाख मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. केदारेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी यापूर्वी 15 लाख रुपये आणि सध्या 7 लाख रुपये असे एकूण 22 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. अमोघसिद्धेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी यापूर्वी 10 लाख रुपये व सध्या 10 लाख असा 20 लाख निधी मंजूर आहे.
भूमिगत केबल व विद्युत पथदिवे बसविण्यासाठी यापूर्वी 2 कोटी 29 लाखाचा निधी देऊन काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी 53.80 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. काडापूर गाव ते सीमालक्ष्मी मंदिर ते अंकली गावातील संशोधन केंद्रापर्यंत रस्ता सुधारण्यासाठी 2 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर झाला असून डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. काडापूरअंकली रस्त्यापासून सनदी मळा मार्गे सिध्दापूरवाडीपर्यंत तसेच जक्कव्वा मंदिर मार्गे रायण्णावर यांच्या शेतापर्यंत 1 कोटी रुपयांच्या निधीतून डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. बसवण्णा मंदिर ते केरूर गावातील घूळिगुडीपर्यंत रस्ता सुधारण्यासाठी 1 कोटी निधी मंजूर झाला आहे. सिध्दापूरवाडी बसस्थानक (बंकापूरे बेकरी) येथून काडापूर माने, शितोळे, शिंदे मळा मार्गे काडापूरअंकली रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यासाठी 1 कोटी 50 लाख निधी मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. गावात 7 लाख रुपयांच्या निधीतून बस शेल्टरचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.याप्रसंगी स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष प्रकाश राचण्णवर, महांतेश पाटील, शिवाजी शिंदे, भरत कोळेकर, अप्पू सनदी, रवी ठुबाके, सुभाष सनदी व नागरिक उपस्थित होते.

विजापूर जिल्ह्यात प्रौढ शाळेला 2 खोल्यांसाठी 25 लाखाचा निधी मंजूर
विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी तालुक्यातील मोकीहाळ गावातील सरकारी माध्यमिक शाळेला 2 वर्ग खोल्या बांधण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे आम.प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले. ते म्हणाले मोकीहाळ गावातील सरकारी माध्यमिक शाळेला वर्ग खोल्यांची कमतरता होती. त्यामुळे 2 वर्ग खोल्या निर्मितीसाठी निधी मंजूर करण्यासाठी मुद्देबिहाळ येथील आमदार आप्पाजी सी. एस. नाडगौडर यांनी मागणी केली होती. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने सन 2025 सालामध्ये आपल्या स्थानिक प्रदेश विकास योजनेअंतर्गत सदर माध्यमिक शाळेच्या 2 वर्ग खोल्या निर्माण करण्यासाठी 25 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


