निपाणी परिसरातील स्वामी समर्थ भक्तांना दोन दिवस पादुका दर्शनाचा लाभःप्रतिक शाह

0

निपाणी,(वार्ताहर)-
अक्कलकोट स्वामी समर्थ पादुकांचे येत्या दि. 16 व 17 रोजी निपाणीत आगमन होत आहे. यावेळी स्वामी भक्तांना दर्शनाचा लाभ व्हावा. जास्तीत जास्त वेळ पादुकांचे सानिध्य निपाणीकरांना मिळावे यासाठी राजमणी ग्रुप आणि निपाणी फुटबॉल अकॅडमी यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सचिन फुटाणकर, प्रतिक शहा यांनी दिली. राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथे राजमणी ग्रुप येथील कार्यालयात आयोजित पत्रकार ते बोलत होते.


यावेळी माहिती देताना प्रतिक शाह म्हणाले. दि. 16 रोजी प्रत्येकवर्षी पादुकांचे आगमन कार्यक्रमाला दिला जाणारा वेळ अपुरा मिळत असल्याने अन्नछत्र मंंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले महाराज व अभयकुमार खोबरे आदी पदाधिकारी यांंना विनंती करुन पाठपुरावा केला आहे. त्यामुळे समितीने निपाणीतील पादुका परिक्रमाचा कालावधी वाढवून तो दोन दिवसांपर्यंत वाढवून दिला आहे. या संधीचा लाभ सर्व स्वामी भक्तांना पुरेपूर लाभ मिळावा या दृष्टीने योंग्य नियोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार स्वामी समर्थ पादुका, पालखीचे आगमन दि. 16 रोजी सकाळी 9 वा. अशोक नगर राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथे राजमणी ग्रुप कार्यालयाठिकाणी आगमन होवून येथे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर पादुका भाविकांना दर्शनासाठी आंदोलन नगर स्वामी समर्थ मंदिरात विसावणार आहेत. येथे सकाळी 9 वा. पासून 10 वा. पर्यंत दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर 11.30 वा. पादुका अमलझरी रोड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात येणार आहे. येथून 1.30 वा. पादुका राणी चन्नम्मा चौक येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. येथे प्रसाद वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पादुका पालखी मिरवणूक भव्य प्रमाणात काढण्यात येणार आहे. मिरवणूक चन्नम्मा चौक, अशोक नगर, कोठीवाले कॉर्नर, गुरुवार पेठ मार्गे व्यंकटेश मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. येथे दर्शन सोहळा होणार आहे. याच ठिकाणी पहाटे विधीवतपणे महाअभिषेक होणार आहे. येथून पादुका पालखी व्यायाम शाळा परिसरातील शरद थिटे यांच्या निवासस्थानी पालखी विसावणार आहे.
सदर कार्यक्रमांचा लाभ सर्व स्वामी भक्तांनी घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला सोमनाथ शिंदे, कपिल शिंदे, ओंकार शिंदे, रणजित माने, करण माने, आशिष भाट, आकाश खवरे, अक्षय जयकर, गणेश घोडके, प्रशांत आजरेकर, राहुल निंबाळकर, संकेत पिसाळ आदींची उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *