कृष्णाघाट मिरज येथे आ. सुरेशभाऊ खाडे यांनी केली पूर परिस्थितीची पाहणी

मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी गुरुवारी सकाळी कृष्णाघाट मिरज येथे भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली व प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
यावेळी मिरजेच्या तहसीलदार सौ. अपर्णा मोरे-धुमाळ, मनपा उपायुक्त सौ. स्मृती पाटील, शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदेसाहेब, मनपाच्या विविध खात्यांचे अधिकारी, भाजप नेते सुरेशबापू आवटी यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी आ. खाडे यांनी पुराचे पाणी आल्याने भयभीत झालेल्या रहिवाशांना, महिलांना धीर दिला व प्रशासनाचे पूर्ण सहकार्य व मदत मिळेल असे ठाम आश्वासन दिल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळाला. यावेळी आ.खाडे यांनी पुराचे पाणी वाढण्याआधी तेथील रहिवाशांना आपल्या जनावरांसह तातडीने स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. त्यांची योग्य त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन सोय करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आ.खाडे यांनी यावेळी केले.