सामाजिक कार्यकर्ते मितेश पवार यांना आरोग्यदूत पुरस्कार

मिरज (प्रतिनिधी)
येथील सामाजिक कार्यकर्ते मितेश पवार यांना सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन कार्यक्रमात आरोग्यदूत पुरस्काराने गौरविण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. विशाल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सिनर्जीचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, जनसुराज्य युवक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, प्रसाद जगताप यांनी अभिनंदन केले.
मितेश पवार हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. गोरगरिबांना शासनाच्या अनेक वैद्यकीय विषयक योजना मंजूर करवून दिल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानामुळे त्यांचा आरोग्यदूत या पुरस्कार पुरस्काराने गौरव करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवार यांच्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी आ.सुरेश खाडे, आ.गोपीचंद पडळकर, आ.सुधीर गाडगीळ, दीपक शिंदे, प्रसाद जगताप उपस्थित होते.