मिरजेतून विवाह नोंदणी कार्यालय हलू देणार नाही ; मिरज सुधार समितीचा इशारा

0
IMG-20260228-WA0016

मिरज विभागीय कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालय सांगलीला हलविण्याचा घाट

मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)

सर्वसामान्यांशी निगडीत असलेल्या मिरज विभागीय कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालय सांगलीत हलविण्याचा घाट प्रशासनाकडून सुरु आहे. याला मिरज सुधार समितीने विवाह नोंदणी कार्यालय सांगलीला हलविण्यास तीव्र विरोध करीत महापालिका सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना महापालिका प्रवेशद्वाराजवळ जाब विचारत हरकतीचे निवेदन दिले.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका स्थापन होऊन २८ वर्षे झाली. महापालिका क्षेत्रातील सांगली एवढेच मिरज शहराची लोकसंख्या व भौगोलिक रचना आहे. शिवाय, मिरज शहर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील महत्वाचे शहरारबरोबच मिरज रेल्वे जंक्शन असल्याने मिरज शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक वैद्यकीय, व्यवसायिक, व्यापार, औद्योगिकसह अन्य कारणांसाठी मिरजेत येतात.

महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात विवाह नोंदणी कार्यालय असल्याने मिरज शहरात येणार्या कर्नाटकासह कोकण, विदर्भ, मराठावाडा आदी भागातील नववर-वधूंची चांगली सोय होत आहे. मात्र, महापालिकेने विवाह नोंदणी कार्यालयाचे एकत्रिकरणाच्या नावाखाली मिरज विभागीय कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालय सांगली येथे हलविण्याच्या हालचाली सुरु केली आहे.याची सुरुवात म्हणून मिरज विभागीय कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालयातील संगणक प्रणाली बंद करण्यात आली आहे. ही बाब आम्हा मिरजकरांसाठी अतिशय गंभीर बाब आहे.

मिरज विभागीय कार्यालयात विवाह नोंदणी कार्यालयात विवाह नोंदणीसाठी येणारे नव वर-वधू हे सर्वसामान्य असल्याने त्यांना वर-वधू, भटजी, साक्षीदारसह असे ६ जणांना घेऊन सांगली कार्यालयात हेलपाटे मारणे म्हणजे पैसा, वेळ वाया बरोबरच व मानसिक त्रास सहन करावे लागणार आहे. म्हणून शुक्रवारी मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, राजेश पाटील, सुरेश झेंडे, दिनेश तामगावे, अमीर डांगे, उदय सखदेव आदी सदस्यांनी महापालिका प्रवेशद्वाराजवळ महापालिका सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना गाठत जाब विचारला. विवाह नोंदणी विभागाच्या अधिकारी डॉ. मनिषा दोरकर यांच्याशी भ्रमणध्वणीवरुन संवाद साधत विवाह नोंदणी कार्यालय स्थलांतरास तीव्र विरोध दर्शविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *