राष्ट्रवादीच्या सेवादल सेलच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत आगवेकर

0
WhatsApp Image 2026-03-03 at 5.38.24 PM

मिरज (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सेवादल सेल) सांगली जिल्हा यांच्या पदाधिकारी निवड व नियुक्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सर्वानुमते प्रशांत आगवेकर यांची सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल  जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. आगामी काळात संघटनवृद्धी, युवकांना जोडणे आणि पक्षाची विचारधारा अधिक व्यापक करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, शहर अध्यक्ष आकाश माने, माजी नगरसेविका आणि सभापती सौ. सुवर्णाताई पाटील, स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष प्रशांत माने आणि पक्षातील विविध आजी माजी पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपमहापौर गजानन मगदूम यांनी ही आगवेकर यांना पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *