मिरजेत खाडे शैक्षणिक संकुलमध्ये आग व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)
दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित एमटीडीके शैक्षणिक संकुल, १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सांगली आणि वाहतूक सुरक्षा दल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने व सांगली मिरज कुपवाड मनपा अग्निशमन विभाग यांच्या सहकार्याने मिरज येथील मातोश्री तानुबाई दगडु खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज येथे आग व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी आग लागल्यास करावयाच्या तात्काळ उपाययोजना, अग्निशमन यंत्रांचा वापर, तसेच भूकंप, पूर अशा आपत्तीच्या वेळी सुरक्षिततेसाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत सागर गायकवाड , लिंगप्पा कांबळे, रावसाहेब चव्हाण आदी सहकाऱ्यांच्या मदतीने मार्गदर्शन केले.
अग्निशमन दलाने घेतलेल्या प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षक वर्गामध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती सुशांत खाडे यांनी सांगितले तसेच यावेळी मुख्याध्यापिका संगीता पाटील व करुणा माने यांनी अग्निशमन अधिकारी माळी व टीमने दिलेल्या माहिती व प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहारी ज्ञानात भर पडली असून, हे विद्यार्थी भविष्यात आग व आपत्ती व्यवस्थापन करू शकतील अशी आशा व्यक्त केली व सर्वांचे आभार मानले.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आ. डॉ सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, कमांडिंग ऑफिसर चंद्रशेखर साठे, ऍडमिन ऑफिसर अभिजीत बर्वे, ए.एन.ओ. विक्रांत गौंड यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.