धोरण,तारण आणि हेतू लक्षात घेवून व्यवहार केल्यास संस्थेची प्रगतीकडे घौडदौडःसुनिल शेट्ये
निपाणी,ता.1(प्रतिनिधी)-
बॅकिंग क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे. सहकार क्षेत्राचा विस्तार वाढत असताना अजूनही ग्रामीण भागासह शहरी भागातही खाजगी सावकारीला महत्व दिले जाते आहे. हा समाजाचा शोषितपणा संपविण्यासाठी सहकार क्षेत्रातने पुढाकार घेणे गरजेचे आहे. जागृती होणे गरजेचे आहे. याकरीता बॅकिग क्षेत्रात पुढे येवून सभासदाबरोबर कर्जाधारकांच्यात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. बॅकेसाठी सभासदांचे योगदान महत्वाचे आहे.धोरण, तारण आणि हेतू लक्षात घेवून व्यवहार केल्यास संस्था प्रगतीकडे घौडदौड करू शकते असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे सहकार खात्याचे मार्गदर्शक सुनिल शेट्ये यांनी केले.
येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्री महात्मा बसवेश्वर संस्थेच्या सहकार सप्ताह व 36 व्या वर्षपुर्ती समारंभात श्री शेट्यें बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, संस्थेने सुविधेनुसार कर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याबरोबर कर्जदारांने चांगल्या प्रकारे कर्ज फेड केल्यास त्याचा क्रेडीट कोर्स वाढत जावून पुढील प्रगतीसाठी महत्वपूर्ण ठरत असतो. शास्त्रोक्त पध्दतीने कर्ज वाटप होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येकांनी आपली बँक म्हणून सहभाग नोंदविला पाहिजे. आज बॅकिंग क्षेत्राला विश्वास, प्रामाणिकपणा आणि संगणक क्षेत्रातील नूतन प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. एआयचा वापर महत्वपूर्ण असून आधुनिकीकरणात कृत्रीत बुघ्दिमता महत्वपूर्ण ठरणार आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी अकोंटंट विभाग अर्थाततच संस्थेचा आडीट महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
संस्थापक अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष सहकाररत्न डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या प्रगतीत संचालकांच्याबरोबर सभासद आणि कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असल्याचे सांगितले. संस्थेने गेल्या 36 वर्षात प्रगतीचा प्रत्येक मैल यशस्वी केला असल्याचे सांगितले. संस्थेने आर्थिक प्रगतीबरोबर सामाजिक, धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर पुढाकार घेवून संस्थेच्या कार्याचा विश्वास सर्वसामान्यांच्यात निर्माण केल्याचे सांगितले. आशिवर्चन करताना प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांनी संस्था फक्त आर्थिक प्रगतीत अग्रेसर नूसन संस्कृती आणि संस्कार जपण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. संस्थेने नेहमी सामाजिक भुमिकेतून काम केले असल्याने संस्थेचा चांगला प्रगतीचा आलेख वाढत चालल्याचे सांगितले.
प्रारंभी स्वामीजी, चेअरमन किशोर बाली व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वन करण्यात आले. तसेच यावेळी केएलई संचालकपदी प्रविण बागेवाडी, भाजपा शहराध्यक्षपदी राजु गुंदेशा व सीए परिक्षेत यश मिळविलेल्या ओकोरेश्वरी सुनिल पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संचालक प्रताप पट्टणशेट्टी, डॉ.एस.आर.पाटील, श्रीकांत परमने, सुरेश शेट्टी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, विद्या कमते , महादेव बडगीर, भद्रेश फुटाणे यांच्यासह सर्व शाखांचे संचालक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सीईओ एस. के.आदन्नावर यांनी प्रगती आढावा घेतला. सूत्रसंचालन संंस्थेचे असिस्टंट सीईओ सुजाता जाधव, राजेंद्र मगदूम यांनी केले तर आभार संस्थेचे असिस्टंट सीईओ सुरज घोडके यांनी मानले.


