इचलकरंजीच्या सौ. भारती पाटील यांना मिरजेत रोटरीतर्फे ‘नवदुर्गा अवॉर्ड २०२५’

मिरज (प्रतिनिधी)
रोटरी क्लब ऑफ मिरज तर्फे आयोजित “नवदुर्गा अवॉर्ड 2025” तसेच “टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड 2025” या पुरस्कार वितरण सोहळ्याचा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात इचलकरंजीच्या सौ. भारती महेश पाटील यांना “नवदुर्गा अवॉर्ड 2025” ने सन्मानित करण्यात आले. सौ. पाटील या चटणी कांडून, आठवडी बाजारात टेबल-खुर्ची लावून बेकरी प्रॉडक्ट्स विकतात आणि तिन्ही मुलांना घडवत आहेत. त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी वाटचालीला गौरविण्यासाठी हा सन्मान देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर धर्मेंद्र खिलारे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब मिरजचे अध्यक्ष ऍड. स्वानंद कौलगुड, सेक्रेटरी ज्ञानराज सावंत, रोटेरियन गिरीश लांडगे, अभय गुळवणी, चैतन्य कौलगुड, रविंद्र फडके, सचिन हंडीफोड, वैभव कौलगुड, डॉ. विजयकुमार कांबळे, राजेंद्र नागरगोजे, उद्योजक महेश पाटील, ट्रेझरर ओंकार बोंगाळे, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगांवे तसेच इतर मान्यवर, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.