रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया सोडताना भावूक पोस्ट
रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया सोडताना भावूक पोस्ट
रोहित शर्मासाठी सिडनीचे मैदान खास ठरले. कारण या मैदानाने रोहित शर्माला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. रोहित कोणत्याही गोष्टी कधीच विसरत नाही. यापुढे तो सिडनीच्या मैदानात कधीच खेळणार नाही, हेदेखील त्याला माहिती आहे. त्यामुळे सिडनी सोडताना रोहित शर्माने एक भावूक पोस्ट केली आहे. रोहित शर्माने आपला एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यावर असे काही एका वाक्यात लिहिले आहे की, चाहत्यांचे डोळे पाणावतील.
रोहित शर्मासाठी ऑस्ट्रेलिया अविस्मरणीय असा देश आहे. कारण याच ऑस्ट्रेलियात रोहित शर्माला सलामीवीर म्हणून ओळख मिळाली. महेंद्रसिंग धोनीने संघात वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर असतानाही युवा खेळाडूला वाव मिळावा, म्हणून रोहित शर्माला सलामीला आणले होते. त्याच ऑस्ट्रेलियाने रोहित शर्मा जेव्हा अडचणीत होता, तेव्हा त्याला साथ दिली. कॅप्टन्सी
गेली होती. रोहित फक्त एक खेळाडू म्हणून संघात होता आणि डोक्यावर टांगती तलवार होती. पण रोहित ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला आणि त्याच्या नावावर सर्वाधिक धावा जमा झाल्या, त्यासाठी रोहित ऑस्ट्रेलिया सोडताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्मान शनिवारी सिडनीच्या मैदानात शतक झळकावले. रोहित शर्माला सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही पुरस्कारही मिळाले. या एका सामन्याने रोहितची परिस्थिती बदलली आणि आता त्याच्या डोक्यावर टांगती तलवार नसेल. रोहित शर्मा रविवारी ऑस्ट्रेलियाहून मुंबईसाठी रवाना झाला. पण सिडनीच्या विमानतळावर जाताच रोहित शर्माने एक आपला फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सिडनी विमानतळामध्ये शिरतानाचा आहे. रोहित शर्माने या फोटोवर एका वाक्यात कमेंट लिहिली आहे.
रोहित शर्मा म्हणाला आहे की, वन लास्ट टाईम सिंगींग ऑफ फॉर्म सिडनी मराठीत चांगल्या शब्दांत म्हणायचे झाले तर अखेरचा हा तुला दंडवत, असे म्हणता येऊ शकते. रोहित शर्माने यावेळी ऑस्ट्रेलिया सोडताना एक भावूक पोस्ट लिहिली आहे. –


