रोटरी पॉल हॅरीस पुरस्काराने मिरजेतील २५ जण सन्मानित

0
WhatsApp Image 2026-05-09 at 2.59.24 PM

मिरज (प्रतिनिधी)
रोटरी इंटरनॅशनलच्या रोटरी फाउंडेशनतर्फे रोटरी क्लब ऑफ मिरजच्या २५ सदस्यांना प्रतिष्ठेच्या ‘पॉल हॅरीस फेलो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कौलगुड फार्म हाऊस येथे आयोजित समारंभात पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये डॉ. रामचंद्र पाठक, प्रफुल्ल शिरगावकर, प्रा. डॉ. रवींद्र फडके, डॉ. रियाज मुजावर, अॅड. स्वानंद कौलगुड, आशुतोष स्वामी, ओमकार बोंगळे, डॉ. सुजय कुलकर्णी, सचिन चौगुले, सिद्धार्थ मजती, अॅड. सचिन हंडीफोड, चैतन्य कौलगुड, विजयकुमार कांबळे, डॉ. संतोष कुलगोड, सम्राट शेटे, चेतन चव्हाण, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अमोल भोकरे, डॉ. राहुल गोसावी, डॉ. अमेय कुलकर्णी, डॉ. सोमशेखर पाटील, डॉ. व्यंकटेश कुलकर्णी, गिरीश लांडगे, सुहास मजती आणि अभय गुळवणी यांचा समावेश आहे.

रोटरी क्लब ऑफ मिरजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात (२०२५-२६) अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र फडके, सचिव डॉ. रियाज मुजावर तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे आणि मिळालेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्य गुणांमुळे या मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती विद्यमान अध्यक्ष अॅड. स्वानंद कौलगुड यांनी दिली.

या पुरस्कारामध्ये रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष फ्रान्सिस्को अरेझो यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र आणि विशेष पिन देण्यात येते. सध्या रोटरी इंटरनॅशनलचे कार्य जगातील २०० हून अधिक देशांमध्ये ४५ हजार क्लब आणि सुमारे १२ लाख सदस्यांच्या माध्यमातून सुरू आहे. रोटरी फाउंडेशनने २०२४-२५ या वर्षात सामाजिक कार्यासाठी तब्बल ५६९ मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे ₹५,३५० कोटी) इतका निधी उभारला आहे. तसेच रोटरी इंटरनॅशनल फाउंडेशनची मालमत्ता १.५ बिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे ₹१४,१०० कोटी) असून, रोटरीचा एंडाव्हमेंट फंड १.९ बिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे ₹१७,८६९ कोटी) इतका आहे. या निधीच्या माध्यमातून पोलिओ निर्मूलन, शिक्षण, पाणीपुरवठा प्रकल्प, आरोग्यसेवा, शांतता प्रस्थापना आणि सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

रोटरीचे संस्थापक पॉल हॅरीस यांनी १२१ वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना केली. मानवतेच्या सेवेसाठी एक हजार अमेरिकन डॉलर (सुमारे एक लाख रुपये) किंवा त्याहून अधिक योगदान देणाऱ्या आणि समाजसेवेसाठी उल्लेखनीय बांधिलकी जपणाऱ्या रोटरी सदस्यांना ‘पॉल हॅरीस फेलो’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *