विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेत प्रवेश : आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर

0
WhatsApp Image 2026-05-11 at 6.00.31 PM

शिंदेंच्या प्रवेशाने तालुक्यात शिवसेनेच्या वाढीस गती

मिरज (प्रतिनिधी)

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे हे सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेले नेतृत्व असून, म्हैसाळ पंचक्रोशीसह मिरज तालुक्याचा सर्वांगीण विकास शिवसेनेच्या माध्यमातून निश्चितपणे साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करत म्हैसाळचे माजी सरपंच व भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मा. आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

म्हैसाळ (ता. मिरज) येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना महानगर प्रमुख मा. मोहन वनखंडे (सर), डॉ. तात्यासो चौगुले, विश्वासराव चव्हाण, अनिल संगलगे, संजय दोड्डमणी, सुनिल बेळवे, किरण घोरपडे, नेमिनाथ चौंडाज आदी मान्यवर उपस्थित होते.

आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर म्हणाले, “म्हैसाळ परिसरासह संपूर्ण तालुक्यात अनेक विकासकामे रखडलेली आहेत. शिवसेना महानगर प्रमुख मा. मोहन वनखंडे (सर) यांच्या नेतृत्वाखाली ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. म्हैसाळ येथील कृष्णा नदीवरील प्रस्तावित बराज गेट धरण हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासदृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्यापासून प्रेरित झालो आहोत. तालुक्याला नवी दिशा देण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू.”

शिवसेना महानगर प्रमुख मोहन वनखंडे (सर) म्हणाले, “आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर यांच्या पक्षप्रवेशामुळे मिरज तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढणार आहे. ते उच्चशिक्षित व अनुभवी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या अनुभवाचा पक्ष संघटन वाढीसाठी निश्चितच फायदा होईल. शिवसेनेत त्यांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल.” यावेळी वसंत खांडेकर, एकनाथ माळी, अमर शेजवळकर, मनोज घाबरे, संजय कोळी, संदीप कांबळे, संतोष कांबळे, सिद्धार्थ कांबळे, रघुनाथ माने, अशोक पाटील, किरण घालवाडे, शंकर शिंदे, मोहन शिंदे आदी उपस्थित होते.

राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी लाभलेल्या शिंदे-म्हैसाळकर घराण्यातील सुसंस्कृत, उच्चशिक्षित व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे मिरज तालुक्यात पक्ष संघटन वाढीस मोठी चालना मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीला बळ देणारा सक्षम पर्याय म्हणून शिवसेनेकडे पाहिले जात असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *